1.1) SAFETY MEASURES IN THE WORKSHOP कार्यशाळेतील सुरक्षा (Part 1)


Potential sources of accidents in the workshop / कार्यशाळेतील अपघातांचे संभाव्य स्त्रोत

SAFETY MEASURES IN THE WORKSHOP / कार्यशाळेतील सुरक्षा

(मराठी करीता खाली स्क्रोल करा)

Every student and artist has the enthusiasm to work in the metalwork department workshop, but some of the wrong methods of working in the workshop can bother everyone. Occasional accidents can also lead to permanent disability; thus, before starting the metalworking practical, we will discuss the possible accidents in the workshop and the safety measures to be taken against them.

Potential sources of accidents in the workshop

Improper handling of machinery and equipment

The frequency of injuries in the workshop is higher due to mishandling. These injuries can lead to accidents such as muscle complaints, general flexibility, and sometimes severe joint dislocations.

Each machine, tool, material has a specific method of use. First learn how to use items from your teacher or upper class students.

Choose the right equipment, materials for the work you are doing. Only by choosing the right material, the work is reduced by 50%.

Identify obstacles and keep area clean

Identify obstacles and remove them from the space where you work, along the way & near the machine; Remove fine metal pieces, unnecessary materials, flammable objects, cloths, etc. Clean the work area before and after the work, and properly dispose of waste and crap.

Mechanism and capacity of Machine

Excessive stress can cause defects. So know the working capacity of the device you are using and use it accordingly. You also need to know the design of the device you are using so that general repairs and maintenance can be done in a timely manner.

Handling method and ability

The user should not use the device; unless he has the ability or proper knowledge to use it. Accidents can occur if the device is used incorrectly or without the ability to handle it.

Lack of rest

Properly planned work is completed on time; If you are in a hurry and working tirelessly to get to work; This can lead to accidents due to stress on your body, brain and the machine you are using.

Take breaks from work from time to time and eat a proper diet, mostly drinking water. Excessive work reduces the water level in the body.

Low light and small space

The working space should be large and well ventilated. There should be enough light. There may be errors in the work done in low lighting.

Negligence

Chatting while using the device, listening to music with headphones, using mobile, etc. can lead to serious accidents.

Unsafe or faulty device

Do not use devices that do not have a proper protective shield or devices that are faulty; It should be reported to the supervisor. Injury can occur if an improper or unsafe device is used.

Emergency Management Information

Understand the emergency management system in each workshop and understand how to use it.

Learn about fire and water systems to use in the event of a fire, switches off the main electrical system in case of any electrical equipment malfunction.

Memorized the emergency service telephone numbers.


SAFETY FIRST 

(Marathi/मराठी)

 

कार्यशाळेतील सुरक्षा

धातुकाम, मिनाकारी, दागिने, इत्यादी काम करतांना एक उत्साह संचारात असतो, ह्या माध्यमाचाच तो परिणाम म्हणायला हवा.  परंतु कार्यशाळेत काम करणाऱ्यांच्या काही चुकीच्या पद्धतीमुळे सर्वांनाच त्रास होऊ शकतो. कधी कधी झालेले अपघात हे कायम स्वरूपी व्यंगत्व सुद्धा देऊ शकतात; त्यामुळे धातुकाम प्रात्यक्षिक सुरवात करण्यापूर्वी आपण कार्यशाळेतील संभाव्य अपघात व त्यापासून सुरक्षेचे उपाय ह्यावर चर्चा करू. 

तुम्ही विद्यार्थी आहात, हौशी कलाकार किंवा व्यावसायिक कलाकार सर्वांनीच कार्यशाळेत प्रवेश करण्यापूर्वी कार्यशाळेचे सुरक्षा नियम व सूचना ह्यांचा अभ्यास करून स्वयंशिस्त ही पाळलीच पाहिजे.

कार्यशाळेतील अपघातांचे संभाव्य स्त्रोत  / Potential sources of accidents in the workshop

यंत्र व साहित्य यांची चुकीची हाताळणी / Improper handling of machinery and equipment

कार्यशाळेत होणाऱ्या इजांच्या वारंवारतेत चुकीच्या हाताळणीमुळे होणाऱ्या दुखापतीचे प्रमाण जास्त असते. ह्या इजांमध्ये स्नायू संबंधी तक्रारी तसेच, सामान्य लचकणे तसेच कधी कधी गंभीर स्वरूपाचे सांधे निसटणे सारखे अपघात होऊ शकतात.

प्रत्येक यंत्र, अवजार, साहित्य यांच्या वापराची विशिष्ट पद्धत असते. सर्वप्रथम आपल्या शिक्षक किंवा वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून वस्तू वापराची पद्धत माहित करून घ्या.

आपण करीत असलेल्या कामासाठी योग्य यंत्र, साहित्य यांची निवड करा. योग्य साहित्याच्या निवडीतच काम ५०% श्रम कमी झालेले असतात.

अडथळे ओळखा व स्वच्छता राखा / Identify obstacles and keep area clean

आपण काम करीत असलेल्या जागेत, मार्गात, यंत्राजवळ असलेले अडथळे ओळखून ते आधी दूर करा; बारीक धातूचे तुकडे, अनावश्यक साहित्य, आग लागू शकणाऱ्या वस्तू, कापड, इत्यादी अडथळे आधीच दूर करा. कामाचे ठिकाण हे काम सुरु करण्यापूर्वी आणि काम संपल्यावर स्वच्छ करा, कचरा व भंगार यांची योग्य विल्हेवाट लावा.

यंत्राची रचना व क्षमतेची माहिती / Mechanism and capacity of Machine

यंत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण दिला तर त्यात दोष निर्माण होतात. त्यामुळे आपण वापरत असलेल्या यंत्राच्या कामच्या क्षमतेची माहिती करून घ्या त्यानुसारच त्याचा योग्य वापर करा. तसेच आपण वापरत असलेल्या यंत्राची रचना सुद्धा आपल्याला माहित असायला हवी त्यामुळे साधारण दुरुस्ती व देखभाल वेळच्या वेळी करता येईल.

हाताळण्याची पद्धत व क्षमता / Handling method and ability

वापरकर्त्याने सुद्धा ते यंत्र वापरण्याची आपली क्षमता किंवा योग्य माहिती असल्याशिवाय यंत्राचा उपयोग करू नये. चुकीच्या पद्धतीमुळे किंवा हाताळण्याची क्षमता नसतांनाही यंत्राचा वापर केल्यास अपघात होऊ शकतो.

विश्रांतीचा अभाव/ Lack of rest

योग्य नियोजनाने केलेलं काम हे वेळेतच पूर्ण होते. परंतु काम पूर्ण करण्याच्या नादात अविश्रांत, निरंतर काम केल्यास त्याचा शरीरावर, मेंदूवर आणि आपण वापरत असलेल्या यंत्रावर ताण येऊन चूक घडण्याची शक्यता असते. वेळोवेळी कामातून विश्रांती घ्या व योग्य आहार घ्या, मुख्यतः पाणी प्या. कामाच्या अतिरिक्त परिश्रमामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते.

अपूर्ण प्रकाश व अरुंद जागा / Low light and small space

काम करत असलेली जागा ही मोठी व हवेशीर असावी. पुरेसा प्रकाश तेथे असावा. अपूर्ण प्रकाशात केलेल्या कामात त्रुटी राहू शकतात.

निष्काळजीपणा / negligence

यंत्र वापरत असतांना गप्पा मारणे, हेडफोन लावून गाणे ऐकणे, मोबाईल चा वापर करणे, इत्यादी कारणांमुळे गंभीर अपघात होण्याची संभावना असते.

असुरक्षित किंवा नादुरुस्त यंत्र / Unsafe or faulty device

ज्या यंत्रांना योग्य ते सुरक्षा कवच नसेल किंवा जी यंत्र नादुरुस्त आहेत अश्या यंत्रांचा वापर करू नये; त्याची माहिती पर्यवेक्षकांना द्यावी. नादुरुस्त किंवा असुरक्षित यंत्र वापरल्यास इजा होऊ शकते.

आपत्कालीन व्यवस्था ची माहिती / Emergency Management Information

प्रत्येक कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन केलेले असते ह्या व्यवस्थेची माहिती करून घ्या व त्याचा वापर कसा करायचे हे समजून घ्या. आग लागल्यावर वापरायचे अग्निशामक व पाण्याची व्यवस्था, कुठल्याही इलेक्ट्रिक उपकरणांना दोष निर्माण झाल्यास मुख्य वीज यंत्रणा बंद करण्याचे स्वीच, बाहेर जाण्याचे मार्ग, अत्यावश्यक सेवा दूरध्वनी क्रमांक, इत्यादींची माहिती घ्या.

सर्वप्रथम सुरक्षितता SAFETY FIRST


Image by succo from Pixabay

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या